Maval news : पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची आमदार सुनिल शेळके यांनी विकास कामासाठी घेतली भेट

Maval news : पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची आमदार सुनिल शेळके यांनी विकास कामासाठी घेतली भेट

Pckhabar- मावळ तालुक्यातील   पर्यटन विकाससह विविध विषयासंदर्भात मावळ विधानसभेचे आमदार सुनिल शेळके यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची मंगळवारी भेट घेतली.

लोहगड-विसापूर ते एकविरा पायथा या रस्त्याचे काम सुरू व्हावे. तसेच एकविरा देवी मंदिर परिसर सुशोभित करण्यासह विविध विषयांवर चर्चा करून निवेदन देण्यात आले. ही कामे लवकरच सुरु करण्यात येतील असे आश्वासन मंत्री ठाकरे यांनी  दिले.

कोरोनामुळे मागील आठ महिन्यांपासून मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळे बंद होती. लॉकडाऊन, कोरोना यामुळे पर्यटन क्षेत्रालाही चांगलाच फटका बसला आहे. अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पर्यटनासारख्या उद्योगाचे नुकसान या संकटामुळे झाले आहे. सद्यस्थितीत मागील काही दिवसांपासून अनेक पर्यटनस्थळे खुली करण्यात आली आहेत. तालुक्यातील पर्यटनस्थळांचा विकास करुन पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवरही भर देता येईल, त्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आमदार सुनिल शेळके यांनी सांगितले.

यावेळी आमदार शेळके यांच्यासमवेत माजी नगरसेवक संदिप शेळके उपस्थित होते.

महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *