Pimpri corona News: शहरात 144 नवीन रुग्ण, 165 जण कोरोनामुक्त, 10 मृत्यू

ही बातमी शेअर करा.

Pimpri corona News: शहरात 144 नवीन रुग्ण, 165 जण कोरोनामुक्त, 10 मृत्यू

Pckhabar-  पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 127 आणि पालिका हद्दीबाहेरील 17 अशा 144 नवीन रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली आहे.  तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 165 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

शहरात आजपर्यंत 87 हजार 51 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 83 हजार 374 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1519 जणांचा तर शहराबाहेरील  परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 627 अशा  2146 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 1049 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 993 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.

शहरातील 8 जणांचा आणि पालिका हद्दीबाहेरील 2 अशा 10 रुग्णांचा आज मृत्यू  झाला आहे. त्यात चिखली, आकुर्डी, पिंपळेगुरव, निगडी, चिंचवड, मोशी, कासारवाडी, लोणावळा, वाघोली येथील रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


ही बातमी शेअर करा.