Dehu news : अभंग प्रतिष्ठानतर्फे युनिकेअर हॉस्पिटल व मातोश्री हॉस्पिटलमधील कोरोना योद्धांचा सन्मान

Dehu news : अभंग प्रतिष्ठानतर्फे युनिकेअर हॉस्पिटल व मातोश्री हॉस्पिटलमधील कोरोना योद्धांचा सन्मान

Pckhabar-  देहूगाव परिसरात कोरोनाचे रूग्ण वाढत असताना श्री क्षेत्र देहू गावातील युनिकेअर हॉस्पिटल व मातोश्री हॉस्पिटल यांनी पुढाकार घेऊन कोविड सेंटर आपल्या हॉस्पिटलमध्ये सुरू केले.  रूग्णांना त्वरित उपचार मिळण्याची सोय झाली. अभंग प्रतिष्ठानच्या माध्यमातून युनिकेअर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.सुहास जोशी व मातोश्री हॉस्पिटल चे प्रमुख डॉ. सुरज महामुनी यांच्या व हाॅस्पिटलमध्ये  कार्यरत असणाऱ्या सर्व सहकारी कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधिक सन्मान करण्यात आला.

कोरोनाच्या या जागतिक महामारीबरोबर लढताना शासकीय यंत्रणेबरोबर खासगी रुग्णालयातील डाॅक्टर, नर्स आदी कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग आहे.


कोरोनाच्या या संकटाशी सामना करताना श्रीक्षेत्र देहू येथे गेल्या दोन महिन्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत होता. या काळात शासनाच्या वतीने चालविण्यात देहूगावातील कोविड सेंटरही अपुरे पडत होते. ज्या कोरोना बाधित बंधू-भगिनींना जास्त त्रास होत होता त्यांना अद्ययावत सुविधा असणारे हॉस्पिटल गरजेचे होते. यामध्ये मुख्यतः ऑक्सिजन,व्हेंटिलेटर व आय. सी. यु .असणे आवश्यक ठरत होते अशावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील हॉस्पिटलला जावे लागत होते. या हॉस्पिटलमध्येही अनेकदा जागा उपलब्ध होत नव्हती, या सगळ्या अडचणी लक्षात घेऊन श्री क्षेत्र देहू गावातील युनिकेअर हॉस्पिटल व मातोश्री हॉस्पिटल यांनी पुढाकार घेऊन कोविड सेंटर आपल्या हॉस्पिटलमध्ये सुरू केले. यामुळे श्रीक्षेत्र देहू पंचक्रोशीतील रुग्णांना आपल्याच गावात उपचार घेणे सोयीचे गेले.आपण आपल्या गावात उपचार घेत आहोत त्यामुळे कोरोना बाधित बंधू भगिनींची मानसिकताही चांगली व सकारात्मक राहत होती. मनातील भीती जात होती व उपचारही अतिशय अद्ययावत व गतीने केले जात होते या त्यांच्या कार्यामुळे अभंग प्रतिष्ठानच्या माध्यमातून युनिकेअर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.सुहास जोशी व मातोश्री हॉस्पिटल चे प्रमुख डॉ. सुरज महामुनी यांच्या व हाॅस्पिटलमध्ये  कार्यरत असणाऱ्या सर्व सहकारी कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधिक सन्मान करण्यात आला.

सेवा कार्याबद्दल सर्वांचे अभंग प्रतिष्ठानच्या सदस्यांनी धन्यवाद मानले.

महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *