Chinchwad news : ‘आम्ही केंद्र सरकारकडे तक्रार करत आहोत, आपणही करा’
Pckhabar- केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनच-4) यांच्या अखत्यारीत येत असलेल्या वाकड ताथवडेतील सेवा रस्त्यांची दुर्दशा झाली असून याकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी ‘आम्ही केंद्र सरकारकडे तक्रार करत आहोत, आपणही करा’ असे आवाहन नागरिकांनी फलकाद्वारे केले आहे.
pgportal.gov.in संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी. जेणेकरून केंद्र सरकारला जाग येईल, असे आवाहन त्यांनी केले आहे. वाकड, ताथवडे, पुनावळेतील सेवा रस्ता केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत येतो. महामार्गावर वाकड, पुनावळे, ताथवडे येथे पूल बांधला आहे. पुलाखाली दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचते. पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे पुलाखालून चारचाकी सुद्धा जावू शकत नाही. वाहतूक कोंडी होते. सेवा रस्त्याची दुर्दशा झाली आहे. खडी वर आली आहे. त्यामुळे वाहने घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढत आहे. स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
वाकड येथील सेवा रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. ताथवडेच्या पुलाखाली पाणी साचले आहे. पुनावळेतील पुलाखाली वाहतूक कोंडी होत आहे. केंद्र सरकारचे काम असताना विनाकारण आम्हाला रोषाला सामोरे जावे लागत आहे. जिथे जिथे खड्डे दिसत आहेत. तिथे रस्त्याच्या कामाबाबत तक्रार करण्यासाठी फलक लावले आहेत. केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर नागरिकांनी तक्रारी नोंदवाव्यात. जेणेकरून केंद्र सरकारला जाग येईल. या रस्त्याच्या अवस्थेबाबत मागील पाच सहा वर्षांपासून तक्रारी करत आहोत. केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार केला आहे. पण, त्याची दखल घेतली नाही. महापालिका आयुक्तांनाही पत्र दिले आहे. पालिकेमार्फत केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करण्याची विनंती केली आहे,
असे शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी सांगितले.
महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply