Poem By Shakshi Prakash Bhujbal : कर्तव्य फाऊंडेशन…हात माणुसकीचा!

Poem By Shakshi Prakash Bhujbal : कर्तव्य फाऊंडेशन…हात माणुसकीचा!
Pckhabar- आहे अशी एक संस्था
जिथे नाही जाती भेद, अन्  नाही राजकारण…
इथे फक्त होते समाजकारण…
कर्तव्य फाऊंडेशन म्हणजे…
गरजूंची हाक, अन् केव्हाही मदतीला धावणारे हात…
कर्तव्य फाऊंडेशन म्हणजे…
भुकेलेल्याच्या हाकेला धावणारे….
अन्  21 व्या शतकातही माणुसकी आहे यावर विश्वास ठेवायला लावणारे… उपकार म्हणून नाही तर कर्तव्य म्हणून सेवा देणारे…
पण कोणाकडून मोबदल्याची अपेक्षा न करता फक्त आशीर्वाद घेणारे…
भुकेल्याला अन्न, अन् निराधाराला आसरा…
असाच होतो त्यांचा जन्मदिवस साजरा…
असे म्हणतात सल्ला मागितला तर हजारो हात पुढे येतात..
पण मदत मागितली तर एखादाचं धजवतो..
असच काहीसं अविरत अन् निस्वार्थी मदतीचं भांडार…
म्हणजे कर्तव्य फाऊंडेशन…
नाही कोणी इथे अध्यक्ष अन् ही कोणी संचालक…
आहेत इथे फक्त निस्वार्थी जनसेवेचे मालक…
अंध अपंगांचा आधार, अन् अनाथांची माऊली…
ज्यांचं कोणीच नाही या जगात त्यांच्या माथ्यावर सदैव कर्तव्याची सावली…
कितीही लिहिले तुमच्या या कार्यावर तरी माझे शब्द अपुरे पडतील ! देत रहा असाच माणुसकीचा हात, तुमच्या प्रेरणेने अनेक जन नक्कीच सामाजिक बांधिलकी जपतील…!
कु.साक्षी प्रकाश भुजबळ

महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *