Dehu news : जिवाची पर्वा न करता आशा वर्कर कार्यरत : संतोष हगवणे
Pckhabar- कोरोनाच्या जागतिक महामारीतही जिवाची, कुटुंबाची पर्वा करता आशा वर्कर महिलांनी देहूतील कोरोना संकट दुर करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. प्रत्येक कुटुंबातील सदस्याची तपासणी, नोंदणी करून त्यांनी मोलाचे कार्य केले, असे मत देहूगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच संतोष हगवणे यांनी व्यक्त केले.
नवरात्री उत्सवानिमित्ताने कोरोना महामारीच्या काळात खर्या अर्थाने महाकालीचे रूप धारण करून कोरोना कालावधीत कार्य करत आहे. हगवणे यांनी या आशा वर्कर महिलांना साडी वाटप करून त्यांचा सन्मान केला. याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी, नेत्ररोग तज्ञ डॉ. किशोर यादव, संतोष हगवणे यांच्या अर्धांगिनी राणी हगवणे, दीपक पवार, सागर मुसुडगे, मंदा हगवणे, तंटामुक्ती अध्यक्ष अतुल काळोखे, गणेश खंडागळे, मुसुडगे, सागर हगवणे, स्वप्नील पवळे, रोहित मोरे, लवांडे सर, विलास गुंटे आदी उपस्थित होते.
देहूगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच संतोष हगवणे म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी नागरिकांना सुखरूप ठेवण्यासाठी डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कर्मचारी, आशा वर्कर यांनी स्वतःच्या जिवाची भीती न बाळगता कार्यरत आहेत. आशा वर्कर यांनी स्वतःची काळजी घेऊन प्रत्येक विभागात जाऊन प्रत्येक कुटुंबातील सदस्य ची तपासणी करून नोंदणी करून त्यांनी मोलाचे काम केले आहे. हे करत असताना त्यांना काही चांगले अनुभव आला. नवरात्रीच्या काळात महामाया आदिशक्तीचा आपण जागर करतो, जयजयकार करतो आणि हा जय जयकार करत असताना मूर्तीत साकारलेल्या मातेचे दर्शन घेऊन साक्षात समाजाची सेवा केलेल्या माता भगिनींचा सन्मान करताना आनंद होत असल्याचे हगवणे म्हणाले.
महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply