Pckhabar-तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या दुरवस्थेबाबत त्वरीत उपाय योजना न केल्यास 23 नोव्हेंबर रोजी चाकण एमआयडीसीतील एचपी चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तळेगाव-चाकण महामार्ग कृती समितीने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.
याबाबत समितीच्या वतीने तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे, की तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाची अवस्था खराब झाली असून दुचाकी चालकांना जीव मुठीत घेऊन दररोज प्रवास करावा लागत आहे. या मार्गावर मोठमोठे जीवघेणे खड्डे पडूले आहेत. त्यामुळे सतत अपघात होत आहेत. बांधकाम विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.
खराब रस्त्यामुळे होणार्या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका, अग्निशमन, एसटी बस, कामगार बस आणि इतर वाहने अडकून पडतात. या निवेदनाची दखल घेऊन उपाययोजना न झाल्यास 23 नोव्हेंबर रोजी तळेगाव-चाकण महामार्गावरील चाकण एमआयडीसीतील एचपी चौकात चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा कृती समितीचे अध्यक्ष नितीन गाडे यांनी दिला आहे.
रस्त्याच्या दुतर्फा मुरूम टाकून डांबरीकरणाने साइडपट्ट्या भराव्यात. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मोरीची व्यवस्था करावी. आवश्यक तेथे सुरक्षा कठडे, रेडियम पेंट, झेब्रा क्रॉसिंग, ब्लिन्कर, दुभाजक बसवणे. रस्त्यावर कमी उंचीवर लोंबकळणार्या वीजवाहक तारा उंच कराव्यात. महामार्गाकडेला लावलेले सर्व अनधिकृत जाहिरात फलक आणि होर्डिंग्ज काढावेत. महामार्गावरील सर्व अतिक्रमणे, अनधिकृत पार्किंग हटवावे, अशा मागण्या समितीने निवेदनात केल्या आहेत.
महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply