Dehu news : आमदार रोहित पवार, आ. सुनिल शेळके, अमित घेनंद यांच्या वाढदिवसानिमित्त 150 महिलांना शिलाई मशीनचे वाटप
Pckhabar- कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार, मावळ विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनिल आण्णा शेळके, देहू शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मिडियाचे अध्यक्ष अमित घेनंद यांच्या वाढदिवसानिमित्त महावितरण, पाणी पुरवठा विभाग कर्मचार्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच 150 महिलांना शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी आमदार सुनिल आण्णा शेळके यांचे बंधू सुधाकर शेळके, राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष सुवर्णा राऊत, उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, माया भेगडे, माजी सभापती हेमलता काळोखे, अध्यक्ष वैशाली टिळेकर, माजी सरपंच रत्नमाला करंडे, देहू शहराध्यक्ष प्रकाश हगवणे, अध्यक्ष योगेश मोरे, देहूचे आजी माजी सरपंच व सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते.
सुधाकर शेळके म्हणाले, फक्त पैसा असून चालत नाही तर तो कुठे आणि कसा खर्च करावा, याची पण इच्छा शक्ती लागते. ती अमितमध्ये आहे.
माजी सरपंच रत्नमाला करंडे यांनी अमितचे सामाजिक कार्याची माहिती उपस्थितांना दिली. माया भेगडे यांनी देखील सर्व महिला सक्षमीकरणमध्ये पुढे असल्या पाहिजे व त्यासाठी अमितदादा पाहिजे.
विकास कंद यांनी अमितने हा प्रवास कसा केला याची माहिती देत मनोगत व्यक्त केले. महिलेला स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी अमित घेनंद यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चातून हि योजना सुरू केली आहे. त्यामुळे कोणतीही महिला या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी देखील प्रयत्न करत राहणार आहे. जनतेनी आगामी ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये प्रभाग क्र. 4 मधून संधी दिली तर या पुढील काळात देखील आपण समाजासाठी चांगले काम करून दाखऊ असे आश्वासन मनोगत व्यक्त करताना दिले.
प्रास्ताविक स्वप्नील काळोखे यांनी केले. सूत्रसंचालन सचिन कुंभार यांनी केले. महेश धोंडगे यांनी आभार मानले.
महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply