Pimpri corona News: मृत्यूचे प्रमाणही घटले! आज 260 नवीन रुग्ण, 199 जणांना डिस्चार्ज, 3 मृत्यू
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 244 आणि पालिका हद्दीबाहेरील 16 अशा 260 नवीन रुग्णांची आज (बुधळवारी) नोंद झाली आहे. शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 86 हजार 114 झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 199 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरात आजपर्यंत 86 हजार 114 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 82 हजार 317 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1493 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्या 616 अशा 2109 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 1376 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.
शहरातील 1 जणांचा आणि पालिका हद्दीबाहेरील 2 अशा 3 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात भोसरी, औरंगाबाद, मावळ येथील रुग्णांचा मृत्यु झाला आहे. मृत्यूचे प्रमाण घटले आहे. आजपर्यंतचे सर्वांत कमी मृत्यू आहेत. ही दिलासादायक बाब मानली जात आहे.
महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply