Pimpri corona News: शहरात आज 201 नवीन रुग्ण, 334 जणांना डिस्चार्ज, 11 मृत्यू
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 193 आणि पालिका हद्दीबाहेरील 8 अशा 201 नवीन रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 334 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरात आजपर्यंत 85 हजार 850 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 82 हजार 118 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1492 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्या 614 अशा 2106 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 1461 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.
शहरातील 7 जणांचा आणि पालिका हद्दीबाहेरील 4 अशा 11 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात च-होली, दापोडी, चिंचवड, दिघी, भोसरी, सातारा, चाकण, शिवणे येथील रुग्णांचा मृत्यु झाला आहे.










Leave a Reply