Dehu news : आमदार सुनिल शेळके युवा मंच, मित्र परिवार व राष्ट्रवादी कॉंग्रेस देहू यांच्यातर्फे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
Pckhabar- मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार सुनिल आण्णा शेळके युवा मंच व मित्र परिवार व राष्ट्रवादी कॉंग्रेस देहू शहर यांच्या वतीने संत तुकाराम विद्यालय देहू येथील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी नारायण भाऊ मोरे, देहू शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रकाश हगवणे, मा. उपसरपंच सचिन साळुंके, मा. उपसरपंच अभिजीत काळोखे, रा. काँ. मावळ तालुका उपाध्यक्ष सचिन काळोखे, रा. यु.काँग्रेस अध्यक्ष पै.योगेश मोरे, प्रा.विकास कंद, विशाल झेंडे, सचिन हगवणे, गणेश हगवणे, स्वप्निल मधुकर काळोखे, रूपेश सोनुणे, पै.ऋषिकेश पचपिंड, दिनेश साळुंके, विनायक गोलांडे तसेच विद्यालयातील आदरणीय शिक्षक वृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका विद्या घोरूडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन मोरे सर यांनी केले.
महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply