Pimpri News: उपमहापौरपदासाठी 6 नोव्हेंबरला निवडणूक; कोणाला मिळणार संधी?
Pckhabar-भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार
उपमहापौर तुषार हिंगे यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या पिंपरी-चिंचवड शहराच्या उपमहापौरपदासाठी 6 नोव्हेंबर 2020 रोजी निवडणूक होणार आहे. 2 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज दाखल करायचे आहेत. याबाबतची माहिती महापालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली.
भाजपने उपमहापौर तुषार हिंगे यांचा बुधवारी (दि.14) तडकाफडकी राजीनामा घेतला. त्यामुळे उपमहापौरपद रिक्त झाले आहे. या पदासाठी 6 नोव्हेंबर 2020 रोजी निवडणूक होणार आहे. महापालिकेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी अकरा वाजता विशेष सभेत ही निवडणूक प्रक्रिया होणार आहे. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत.
महापालिकेत भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे भाजपचा उपमहापौर होणार हे निश्चित आहे. आगामी पालिका निवडणुकीला 14 महिन्यांचा कालावधी आहे. त्यापार्श्वभूमीवर पक्ष उपमहापौरपदी कोणाला संधी देतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघातील सदस्याला की चिंचवड विधानसभा मतदारसंघात उपमहापौरपद जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)
..










Leave a Reply