Maval news : आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योद्धा पोलिसांचा सत्कार
Pckhabar-मावळ विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आमदार सुनील अण्णा शेळके युवा मंच मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने देहूरोड येथील पोलीस स्टेशन मधील सर्व पोलीस बांधवांना मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल देऊन सन्मानित करण्यात आले.
कोरोना महामारीच्या परिस्थितीत देहूरोड येथील परीसरात स्वतःच , कुटुंबाची पर्वा न करता जन सामान्यांची सेवा करीत कोरोना नियंत्रित ठेवण्याचे महाकार्य आमच्या पोलीस बांधवांनी केले. त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मावळचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या वेळी महिला तालुका अध्यक्षा सुवर्णा राऊत, देहूरोड शहराध्यक्ष ॲड.कृष्णा दाभोळे, मा.अध्यक्ष मिकीजी कोचर, तळेगाव शहर महिला अध्यक्ष सुनीता काळोखे, उपाध्यक्षा मोनिका बेंजामिन, सरचिटणीस अदिती सोरटे, रेखाताई दरेकर, के.प.ॲडम, पनीर बोटले, मुकेश फाले आदी मान्यवर उपस्थित होते.
महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply