Maval news : आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त 250 विद्यार्थ्यांना स्कुल बॅगचे वाटप
Pckhabar- मावळ विधानसभेचे आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त देहू येथील कर्तव्य फाऊंडेशनने मावळ तालुक्यातील 250 गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना स्कुल बॅगचे वाटप करण्यात आले.
अनलॉक सुरू झाले आहे. परंतु कोरोनामुळे अनेक कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. काही दिवसात शाळा सुरु होतील व मुलांना स्कुल बॅगची गरज पडेल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून देहूतील सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक विवेक वसंत काळोखे यांनी 250 स्कुल बॅगचे नियोजन केले. मावळ तालुक्यातून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांची नावे मागवून त्यांना स्कूल बॅगचे वाटप केले.
या कार्यक्रमासाठी विवेक काळोखे, प्रवीण खरे, प्रवीण गायकवाड, मयूर गायकवाड, कुटे सर उपस्थित होते.
सोशल डिस्टनसिंग, सॅनिटीयझर व सर्व नियम पाळून कर्तव्य फाउंडेशन देहूच्या सदस्यांनी हा कार्यक्रम उत्तमरित्या पार पाडला. कर्तव्य फाउंडेशन देहूचे सर्व सदस्य कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply