Pimpri news: मराठी लघुफिल्म व गीत स्पर्धा
Pckhabar- स्वच्छ महाराष्ट्र / भारतअभियान (नागरी) अंतर्गत पिंपरी- चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रामध्ये स्वच्छ सर्वेक्षण 2021 सुरु झालेले आहे. या अभियानामध्ये नागरीकांचा व समाजातील सर्व घटकांचा व्यापक स्वरुपात सहभाग असणे. तसेच माहिती, शिक्षण व संवादाद्वारे वर्तनामध्ये बदल घडविणे हा या सर्वेक्षणाचा प्रमुख हेतु आहे. त्या अनुषंगाने मराठी लघुफिल्म (Short Movie) व गीत (Jingle) स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धा सर्व वयोगटातील नागरिकांसाठी खुली आहे. सदर फिल्म किंवा गीता मध्ये पिंपरी-चिंचवड शहराचे नाव येणे अनिवार्य आहे. कच-याबाबत नागरिकांची जबाबदारी, ओला सुका कचरा वर्गीकरण, हगणदारी मुक्त शहर, कचरामुक्त शहर, प्लास्टीकबंदी, कोवीड 19 स्वच्छता विषयक बाबींबाबत मराठी लघुफिल्म (Short Movie) व गीत (Jingle) मोबाईल मध्ये रेकॉर्ड करुन महापालिकेच्या sbm2020@pcmcindia.gov.in या ईमेल आयडी 30 ऑक्टोबर 2020 पर्यंत पाठविण्याचे आवाहन केले आहे.
प्राप्त होणा-या स्पर्धकामधुन पालिकेतर्फे प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकांना प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात येईल. शहरातील जास्तीत जास्त नागरीक / संस्था यांनी सहभाग नोंदवुन पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्यास महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply