Pcmc news: महापालिका विषय समिती सभापतीपदी ‘यांची’ होणार बिनविरोध निवड

Pcmc news: महापालिका विषय समिती सभापतीपदी ‘यांची’ होणार बिनविरोध निवड

Pckhabar-पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समिती सभापतीपदासाठी सत्ताधारी भाजपच्या स्वीनल म्हेत्रे, महिला व बालकल्याण चंदा लोखंडे , शहर सुधारणा सोनाली गव्हाणे , क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक उत्तम केंदळे आणि शिक्षण समितीसाठी मनीषा पवार यांचे अर्ज दाखल केले आहेत. त्यांची बिनविरोध निवड निश्चित आहे. त्यावर शुक्रवारी (दि.23) शिक्कामोर्तब होईल. विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस अर्ज भरणार नसल्याने बिनविरोध निवडणूक होणार आहे.

पाच विषय समितींच्या सभापतीपदासाठी आज (सोमवारी) दुपारी 3 ते 5 या वेळेत अर्ज दाखल करायचे होते. सत्ताधारी भाजपच्या पाच नगरसेवकांनी अर्ज दाखल केले आहेत. विषय समित्यांमध्ये बलाबल कमी असल्याने विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसने अर्ज दाखल केले नाहीत. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार आहे. भाजपने शिक्षण समितीपदी मनीषा पवार यांना सलग दुसऱ्यावेळी तर स्वीनल म्हेत्रे आणि सोनाली गव्हाणे यांना पुन्हा एकदा सभापतीपद दिले आहे.

विरोधी पक्षनेते राजू मिसाळ म्हणाले, ”पालिकेच्या पाचही विषय समित्यांमध्ये सत्ताधारी भाजपचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ तीन सदस्य आहेत. बलाबल नसल्याने आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केले नाहीत”.

दरम्यान, महापालिका मुख्यालयाच्या तिस-या मजल्यावरील मधुकर पवळे सभागृहात 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता विषय समितींच्या सभापतीपदासाठी निवडणूक प्रक्रिया होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महिला व बालकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. ऋषीकेष यशोद कामकाज पाहणार आहेत.

 

महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *