Pimpri news : व्यवसायाभिमुख शिक्षण पद्धतीकडे वाटचाल काळाची गरज : सदाशिव सुरवसे

Pimpri news : व्यवसायाभिमुख शिक्षण पद्धतीकडे वाटचाल काळाची गरज : सदाशिव सुरवसे

Pckhabar- नोकरीभिमुख शिक्षण पद्धतीतून व्यवसायाभिमुख शिक्षण पद्धतीकडे वाटचालीच होत आहे. ही पद्धत भविष्यात गरजेची आहे. “उद्योजक जन्माला येत नाही तो घडविता येतो ” याची अनेक उदाहरणे देऊन, नवयुवकांनी उद्योजकतेकडे वळावे असा संदेश, महाराष्ट्र राज्य शासनाच्या उद्योग विभागाचे सहसंचालक सदाशिव सुरवसे यांनी दिला.

लायन्स क्लब्स इंटरनॅशनलच्या कौशल्य विकास प्रकल्पांतर्गत लायन्स क्लब ऑफ पूना निगडी व प्रेरणा कौशल्य विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने “शासन आपल्यादारी-उद्योजगता घरोघरी” या विषयावर ऑनलाईन परिसंवाद सुरवसे बोलत होते.

परिसंवादाचे उदघाटन माजी प्रांतपाल व यशस्वी उद्योजक एम जे एफ लायन ओमप्रकाश पेठे यांनी केले.

ऑगष्ट महिन्यात “आय टी आय- भविष्यातील संधी ” व सप्टेंबरमध्ये ” व्यवसायाची क्षितिजे ” या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. तिसरे पुष्प महाराष्ट्र राज्य शासनाचे उद्योग सहसंचालक सदाशिव सुरवसे यांनी “शासन आपल्यादारी- उद्योजकता घरोघरी” या विषयावर गुंफले. शासनाच्या अनेक योजना बनवितांना सदाशिव सुरवसे यांनी सामान्य माणूस नजरेसमोर ठेवला. महिला, छोटे उद्योजक , नवीन स्टार्ट अप्स ,कौशल्य विकास यांना अनुसरून शासन योजना बनविते यावर त्यांनी प्रकाश टाकला.
उद्योजकता विकास , शासनाच्या विविध योजना, MSME ,विकास प्रशिक्षण व वित्तसहाय्य , प्रोत्साहने , सबसिडी योजना या विषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली .

व्यवहारातील काटेकोरपणा, प्रबळ इच्छाशक्ती, स्वतःची कामे स्वतः करणे , कामाची लाज न बाळगणे, व्यवसायाची संधी असलेल्या ठिकाणी जाण्याची तयारी ठेवणे,घरातील व्यक्तींचा सहभाग, लोग काय म्हणतील याची भिती न बाळगणे, पैशांचे मूल्य राखणे हे गुण व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असल्याचे मत सुरवसे यांनी व्यक्त केले.

या परिसंवादात ११० जणांनी भाग घेतला. व्यवसायासंबंधी मार्गदर्शनासाठी त्यांच्या कार्यालयाची दारे सदैव उघडी असतील असे त्यांनी उपस्थितांना आवर्जून सांगितले.

कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन व सूत्रसंचालन डिस्ट्रिक्ट स्कील डेव्हलपमेंटचे चेअरपर्सन एम जे एफ लायन अशोक येवले यांनी केले. लायन मारुती मुसमाडे यांनी सदाशिव सुरवसेंचा परिचय करून दिला.

सेक्रेटरी लायन दुर्गाशंकर बेहरा व जॉईंट सेक्रेटरी लायन ऋषिकेश मुसमाडे यांनी परिसंवादाचा समारोप केला.

 

महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *