Pcmc corona news: शहरातील ‘या’ भागात कोरोनाचे सर्वाधिक ॲक्टीव्ह रुग्ण

Pcmc corona news: शहरातील ‘या’ भागात कोरोनाचे सर्वाधिक ॲक्टीव्ह रुग्ण
Pckhabar- पिंपरी-चिंचवड  पालिकेच्या ‘ब’ प्रभाग कार्यालय हद्दीतील  रावेत,  किवळे-विकासनगर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, चिंचवड परिसरात कोरोनाचे सर्वाधिक म्हणजेच 589 सक्रिय रुग्ण आहेत. 

 क्षेत्रीय कार्यालयानिहाय सक्रिय रुग्ण संख्या!
‘अ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संभाजीनगर,  मोहननगर, आनंदनगर, चिंचवडस्टेशन, आकुर्डी, प्राधिकरण, आनंदनगर, भाटनगर भागात 243 सक्रिय रुग्ण आहेत.

‘ब’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या रावेत,  किवळे-विकासनगर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, चिंचवड प्रभागात सर्वाधिक म्हणजेच 589 सक्रिय रुग्ण आहेत.

‘क’ –  क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या नेहरूनगर, खराळवाडी, अजमेरा, बोऱ्हाडेवाडी, धावडेवस्ती, इंद्रायणीनगर भागात कोरोनाचे 269 रुग्ण आहेत.

‘ड’ –  क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या वाकड, पिंपळेनिलख, पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव भागात कोरोनाचे 348 सक्रिय रुग्ण आहेत.

‘इ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या भोसरी, गवळीनगर, चऱ्होली, दिघी भागात 551 रुग्ण आहेत.  प्रभागातील रुग्णसंख्या तीन हजाराच्या पुढे गेली होती. आता नियंत्रणात आली आहे.

‘फ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या चिखली,  कृष्णानगर, तळवडे-रुपीनगर,  यमुनागनर, निगडी गावठाण, सेक्टर क्रमांक 22 या प्रभागात कोरोनाचे 424 रुग्ण आहेत.

‘ग’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या पिंपरीगाव, थेरगाव, गणेशनगर, रहाटणी भागात कोरोनाचे 321 सक्रिय रुग्ण आहेत.

‘ह’ –  क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संत तुकारामनगर, महात्माफुलेनगर, दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, नवी सांगवी, सांगवी भागात सर्वात कमी म्हणजेच  कोरोनाचे 326 सक्रिय रुग्ण आहेत.  एकूण 4362 सक्रिय रुग्णांवर कोविड केअर सेंटर, महापालिका, खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  

 
दरम्यान, महापालिकेने शुक्रवारी (दि.16) रात्री दिलेल्या नकाशानुसारची ही आकडेवारी आहे. शहरातील 2 हजार 209 सक्रिय रुग्णांवर पालिका रुग्णालय, सीसीसी सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. काही रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  शहरातील रुग्णसंख्या 85 हजार पार झाली आहे. शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून शहरातील 85 हजार 114 जणांना कालपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.  त्यापैकी 80 हजार 752 जणांनी कोरोनाविरोधातील लढाई जिंकली आहे.  तर, खासगी रुग्णालये, होम आयसोलेशन असे 4 हजार 362 सक्रिय रूग्णांवर उपचार सुरू आहेत.  शहरातील 1464 जणांचा तर शहराबाहेरील  परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 596 अशा  2060 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *