Pcmc news: विषय समिती सभापतीपदासाठी सोमवारी दाखल करायचेत अर्ज

Pcmc news: विषय समिती सभापतीपदासाठी सोमवारी दाखल करायचेत अर्ज

Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समिती, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक आणि शिक्षण समिती या पाच विषय समितींच्या सभापतीपदासाठी येत्या सोमवारी (दि.19) दुपारी 3 ते 5 या वेळेत अर्ज भरता येणार आहेत, अशी माहिती महापालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली. सभापतीपदाची प्रत्यक्ष निवडणूक 23 ऑक्टोबर 2020 रोजी होणार आहे.

महापालिका मुख्यालयाच्या तिस-या मजल्यावरील मधुकर पवळे सभागृहात 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता विषय समितींच्या सभापतीपदासाठी निवडणूक प्रक्रिया होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महिला व बालकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. ऋषीकेष यशोद कामकाज पाहणार आहेत.

कोरोनामुळे विषय समितीच्या निवडणुका राज्य सरकारने लांबणीवर टाकल्या होत्या. पालिकेतील समित्यांची मुदत संपल्याने बरखास्त झाल्या होत्या. अनलॉकमध्ये राज्य सरकारने ऑनलाईन सभेद्वारे निवडणुका घेण्यास पुन्हा परवानगी दिली आहे. नव्याने विषय समित्यांचे गठन केले जाणार आहे. त्यानुसार महापालिकेच्या विधी, महिला व बाल कल्याण, शहर सुधारणा, क्रीडा-कला-साहित्य व सांस्कृतिक आणि शिक्षण समितीत 13 ऑक्टोबर रोजी झालेल्या महासभेत सदस्यांची निवड करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *