Pimpri corona News: आज 233 नवीन रुग्ण, 472 जणांना डिस्चार्ज, 12 मृत्यू
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 228 आणि पालिका हद्दीबाहेरील 5 अशा 233 नवीन रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 472 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरात आजपर्यंत 85 हजार 114 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 80 हजार 752 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1464 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्या 596 अशा 2060 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 2209 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.
शहरातील 7 जणांचा आणि पालिका हद्दीबाहेरील 5 अशा 12 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात चिंचवड, पिंपरी, भोसरी, सांगवी, थेरगाव, काळेवाडी, आळंदी, जुन्नर, शेंडेवाडी, शिवाजीनगर येथील रुग्णांचा मृत्यु झाला आहे.










Leave a Reply