Pimpri news : हा तर विरोधकांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रकार

Pimpri news : हा तर विरोधकांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रकार

  Pckhabar- सभा कामकाजामध्ये विरोधकांना प्रखर विरोधच्या वेळी आपले म्हणणे ठामपणे मांडून आपल्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी विरोध करण्यासाठी मानदंडापर्यंत जाण्याची प्रथा आहे. लोकशाही परंपरेमध्ये हा विरोधकांचा हक्क आहे. त्याचप्रमाणे सभेमध्ये काही गोंधळ झाल्यास मानदंड उचलला गेल्यास सभागृह शांत होते. मात्र, मानदंड उचलूच नये, म्हणून अडथळा निर्माण करणे योग्य आहे का? हा तर विरोधकांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रकार असल्याची टीका विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी केली आहे. तसेच हा अडथळा त्वरीत काढावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात महापालिकेची दरमहिन्याची सर्वसाधारण सभा होते. सभेचे पीठासन अधिकारी यांच्या आसनासमोर प्रथेप्रमाणे मानदंड ठेवला जातो.  सभागृहामध्ये पीठासन अधिकार्‍यांच्या आसनासमोर मानदंडासमोर सत्ताधारी भाजपने  जाणीपुर्वक अडथळा निर्माण केला आहे. विरोधकांना मानदंडापर्यंत जाता  येणार नाही. वस्तुत:  सन 2012 पासून हे नवीन सभागृह अस्तित्वात आल. तेव्हा राष्ट्रवादी कॉग्रेसची सत्ता होती. त्यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने विरोधकांना कायम आदराची वागणूक दिली. मानदंडासमोर अडथळा निर्माण करण्याची हि कल्पना कोणाच्या सुपिक डोक्यात आलेली आहे. महापौर माई ढोरे आपणही पूर्वी राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये होता. त्यावेळी आपण विरोधकांना अशी वागणूक दिली आहे का? असा सवाल मिसाळ यांनी महापौरांना केला आहे.  
 सभागृहातील पीठासन अधिकार्‍यांच्या आसनापुढील मानदंडाच्या समोरील अडथळा म्हणजे पूर्वीपासून चालत आलेल्या प्रथेचा भंग करणारे आहे. तसेच विरोधकांच्या हक्कावर गदा आणण्याचा एकप्रकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे हा अडथळा त्वरीत काढून टाकण्यात यावा. अन्यथा महापौर कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी दिला आहे. 

महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *