Dehu news : आमदार रोहित पवार, आ. सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांना शिलाई मशीनचे वाटप
Pckhabar- राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार आणि मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त देहूगाव राष्ट्रवादी काँग्रेस आणि सोशल मिडिया अध्यक्ष अमित घेनंद यांच्या वतीने दि. 21 ऑक्टोबर रोजी गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार आहे.
देहुगावातील संत कृपा मंगल कार्यालयात
सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी शिलाई मशिन वाटप व जाहीर नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती देहूगाव राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडियाचे अध्यक्ष अमित घेनंद यांनी दिली.
महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply