Pimpri News: पालिकेतील ‘या’ अधिकाऱ्यांना  ‘उपायुक्त’पदी बढती

Pimpri News: पालिकेतील ‘या’ अधिकाऱ्यांना  ‘उपायुक्त’पदी बढती

Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील  सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे, स्मिता झगडे, पालिका सेवेतील  आशादेवी दुरगुडे, चंद्रकांत इंदलकर, मनोज लोणकर आणि संदीप खोत यांना उपायुक्तपदी बढती देण्यात आली आहे.  आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी याबाबतचा आदेश पारित केला आहे.

पिंपरी महापालिकेचा ‘ब’ वर्गात समावेश झाला आहे.  पालिकेच्या नवीन आकृतीबंध, सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण नियमांना मंजुरी मिळाली असून  नवीन आकृतीबंधानुसार उपायुक्तांच्या पदाची निर्मिती झाली होती.  

महापालिकेत मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव सुभाष इंगळे, अजय चारठणकर पालिकेत उपायुक्त म्हणून यापूर्वीच रुजू झाले आहेत. पालिकेत  प्रतिनियुक्तीवर सहाय्यक आयुक्तपदी कार्यरत असलेले ‘सीओ’ केडरचे मंगेश चितळे,  स्मिता झगडे, पालिका सेवेतील सुरक्षा विभागाच्या सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अ प्रभागाचे क्षेत्रीय अधिकारी चंद्रकांत इंदलकर, प्रशासन विभागाचे  मनोज लोणकर आणि क्रीडा विभागाचे संदीप खोत यांना उपायुक्तपदी बढती दिली आहे.

महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *