Dehu news : अभंग प्रतिष्ठानतर्फे ऑनलाईन शिक्षणासाठी दोन विद्यार्थींनीना मोबाईल भेट
Pckhabar- अभंग प्रतिष्ठान श्रीक्षेत्र देहू यांच्या वतीने मंगळवारी संत जिजाबाई कन्या विद्यालय, देहू येथील इयत्ता दहावी मध्ये अध्ययन करणाऱ्या कु. वैष्णवी राम कदम आणि कु. अश्विनी विनायक झाडके या विद्यार्थींनीना ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल फोन भेट देण्यात आले.
या विद्यार्थीनींना घरातील प्रतिकूल परिस्थितीमुळे मोबाईल उपलब्ध नसल्याने ऑनलाइन तासिकेला बसणे शक्य होत नव्हते. सौ विद्या घोरुडे या संत जिजाबाई विद्यालयातील माजी विद्यार्थीनी असून सध्या संत तुकाराम विद्यालय देहू या ठिकाणी कार्यरत आहेत. विद्या भगवान घोरूडे यांनी या विद्यार्थ्यांची अडचण अभंग प्रतिष्ठानच्या सदस्यांशी संवाद साधून लक्षात आणून दिली. या विद्यार्थ्यांची समस्या लक्षात घेऊन अभंग प्रतिष्ठानच्या माध्यमातून या गरजू विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल उपलब्ध करून देण्यात आले.
या मोबाईलसाठी विशेष सहकार्य उद्योजक अमोल नामदेव काळोखे व देहूचे माजी उपसरपंच शसचिन संभाजी साळुंके यांचे लाभले. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. लुटे एस. आर., सह शिक्षिका राऊत बी. एस., पवार व्ही. एन, गमे एस. एस.,
भंडारे के. डी., काळे मामा, बांगर मामा
यांच्यासह अभंग प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते. यावेळी शैलेश चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील यशस्वी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply