Pimpri Corona News: दिलासादायक: कालच्या पेक्षा आज आणखी कमी कोरोना रुग्ण!
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 244 आणि पालिका हद्दीबाहेरील 2 अशा 246 नवीन रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली आहे. शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 84 हजार 275 झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 520 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरात आजपर्यंत 84 हजार 275 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 79 हजार 278 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1447 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्या 578 अशा 2025 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 2954 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.
शहरातील 6 जणांचा आणि पालिका हद्दीबाहेरील 12 अशा 18 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात भोसरीतील 62, 70 वर्षीय दोन पुरुष, पिंपळेसौदागर येथील 80 वर्षीय वृद्ध, आकुर्डीतील 58 वर्षीय, पिंपरीतील 61 वर्षीय पुरुष आणि चिखलीतील 64 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तर, हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी-चिंचवड हद्दीमधील म्हाळुंगेतील 70, 64 वर्षीय दोन पुरुष, देहूगांवातील 45 वर्षीय, जुन्नर 46 वर्षीय, आंबेगांवातील 57 वर्षीय, नारायणगांवातील 62 वर्षीय, माण येथील 50 वर्षीय, पारगांव येथील 29 वर्षीय, शिरुर येथील 34 वर्षीय युवकाचा आणि खेड येथील 42 वर्षीय महिला, चाकणमधील 80 वर्षीय आणि मंचर येथील 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.










Leave a Reply