Pimpri News: गुड न्यूज! कोरोनाचे रुग्ण डबल होण्याचा कालावधी 120 दिवसांवर – आयुक्त हर्डीकर
Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचे रुग्ण डबल होण्याचा कालावधी 120 दिवसांवर गेला आहे. म्हणजे आजपासून 120 दिवसांनी शहरातील रुग्ण दुप्पट होतील. डब्लिंग रेट वाढत आहे. ही दिलासादायक बाब मानली जात आहे. याबाबतची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.
शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या 85 हजाराच्या उंबरठ्यावर आहे. शहरात सक्रिय रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. शहरात कालपर्यंत 83 हजार 785 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 78 हजार 149 जणांनी कोरोनाविरोधातील लढाई जिंकली आहे. सध्या 5 हजार 636 सक्रिय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील 1432 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्या 559 अशा 1991 जणांचा कालपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, शहरातील कोरोनाचे रुग्ण दुपटीचा कालावधी 120 दिवसांवर गेला आहे. 29 सप्टेंबर रोजी 74 दिवसांवर होता. आता 120 दिवसांवर गेला आहे. आजपासून पुढील 120 दिवसांनी रुग्ण दुप्पट होतील. दिवसाला साडेतीन हजार चाचण्या केल्या जात आहेत. पाठीमागे गणेशोत्सव कालावधीत नागरिक एकत्र आल्यामुळे कोरोनाची रुग्णसंख्या वाढली होती.सध्या दिवसाला साडेतीन हजार चाचण्या केल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले.










Leave a Reply