Pimpri corona News: रुग्णवाढीला ब्रेक!

Pimpri corona News: रुग्णवाढीला ब्रेक!
आज 461 नवीन रुग्ण, 529 जणांना डिस्चार्ज, 6 मृत्यू

Pckhabar-मागील पंधरा दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णवाढीला लागलेला ब्रेक कायम आहे. शहराच्या विविध भागातील 440 आणि पालिका हद्दीबाहेरील 21 अशा 461 नवीन रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 529 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

शहरात आजपर्यंत 83 हजार 433 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 77 हजार 766 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1417 जणांचा तर शहराबाहेरील  परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 546 अशा 1963 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 2703 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.

शहरातील 5 जणांचा आणि पालिका हद्दीबाहेरील 1 अशा 6 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात चिंचवड, नवी सांगवी, पिंपरी, पिंपळेगुरव, तळेगांवदाभाडे येथील रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *