Pimpri News: पीएमपीएमएलच्या संचालक मंडळावर एका नगरसेवकाची लागणार वर्णी

Pimpri News: पीएमपीएमएलच्या संचालक मंडळावर एका नगरसेवकाची लागणार वर्णी
Pckhabar- पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल)च्या संचालक मंडळावर पिंपरी-चिंचवड महापालिकेतून निवड झालेल्या एका नगरसेवकाची संचालक म्हणून निवड होणार आहे.

सन 2007 मध्ये पीएमटी आणि पीसीएमटी या दोन्ही परिवहन संस्थेचे एकत्रीकरण होऊन पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. हि संस्था स्थापन करण्यात आली. संस्था स्थापन झाल्यानंतर सरकारच्या निर्णयाद्वारे संचालक मंडळाची रचना अंतिम करण्यात आली. यामध्ये पुणे महापालिकेचे तीन संचालक घेतले. त्यात महापौर, स्थायी समिती सभापती आणि महासभेतून निवडून आलेला एक नगरसेवकाचा समावेश केला.

तर, पिंपरी-चिंचवड पालिकेचे महापौर, स्थायी समिती अध्यक्ष असे दोन संचालक नियुक्तीस मान्यता देण्यात आलेली आहे. पिंपरी-चिंचवड पालिकेचे भौगोलिक क्षेत्र व लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पुणे पालिकेप्रमाणे पिंपरी पालिकेचाही एक जादा संचालक असणे आवश्यक वाटते. जेणेकरुन पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या सोईसाठी परिवहनचा पाठपुरावा करणे सोईचे होईल.
 
पिंपरी पालिकेच्या महासभेमधून निवड झालेल्या एका नगरसेवकास संचालक म्हणून नेमणुकीस मान्यता द्यावी. या संचालक पदनिर्मीतीस शासनाची मान्यता मिळण्यासाठी प्रशानाने पाठपुरावा करावा अशी सूचना करत स्थायी समितीने अंतिम मान्यतेसाठी या प्रस्तावाची महासभेकडे शिफारस केली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *