Talegaon news : चिकन, अंड्याची मागणी वाढली ; पोल्ट्री उद्योजकांना ’अच्छे दिन’
Pckhabar- चिकन आणि अंडी खाल्ल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढते. असा सल्ला वैद्यकीय तज्ञांनी दिल्यानंतर अंडी आणि चिकनच्या दरात चांगलीच वाढ झालेली आहे. त्यामुळे पोल्ट्री उद्योगाला सुगीचे दिवस आले आहेत. त्यामुळे पोल्ट्री उद्योजक सुखावले आहे.
राज्यात आणि देशात मार्च-एप्रिल दरम्यान कोरोना महामारी आली. त्यावेळी कोरोना हा चिकन खाल्ल्याने होतो. अशा प्रकारचा अपप्रचार काही समाजकंटकांनी समाज माध्यमाद्वारे पसरविल्याने पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आला होता. चिकन आणि अंडी यांचे बाजार भाव एकदम कोसळले होते. चिकनला तर कवडी किंमतही मिळत नव्हती. अखेर काही काही जणांनी कवडी किमतीत कोंबड्या विकल्या. मध्यंतरी काही पोल्ट्री व्यावसायिकांनी शंभर रुपयाला तीन, चार कोंबड्या बाजारात जाऊन विकल्या होत्या. तर काही जणांनी पोल्ट्री व्यवसाय बंद केला होता. मात्र कोरोनाच्या संशोधनानंतर प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अंडी आणि चिकन खाणे गरजेचे आहे. हे सिद्ध झाल्याने अनेकांनी कोरोनापासून सुटका होण्यासाठी, आपली रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अंडी आणि चिकन खायला सुरुवात केल्याने अंड्याचे भाव सहा ते सात रुपये तर चिकन 160 ते180 पर्यंत कडाडले आहे.
बाजारपेठेत अंडी आणि चिकनच्या वाढत्या दराने पोल्ट्री उद्योजक पुन्हा आपल्या व्यवसायाकडे वळलेले असून अतिशय चांगल्या पद्धतीने हा व्यवसाय करू लागले आहेत. सध्या बाजारात अंड्याला सहा ते सात रुपये तर चिकनचे दर 180 ते 200 रुपये पर्यंत वाढलेले आहेत. सध्या अशीच चिकनची मागणी वाढली तर दोनशे रुपये पर्यंत घाऊक बाजारपेठेमध्ये चिकनचे दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या वाढत असलेला बाजार भाव व चिकन-अंड्याची मागणी वाढत असल्याने पोल्ट्री व्यावसायिक व कंपनी चालक समाधान व्यक्त करत आहे.
मावळ तालुक्यात एक हजार पेक्षा जास्त पोल्ट्री उद्योजक असून कोरोनाच्या काळात सुमारे दोनशे पोल्ट्री उद्योजकांनी आपले व्यवसाय बंद ठेवले आहेत. मात्र सध्या अंडी आणि चिकन याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने पोल्ट्री उद्योजकांना ’अच्छे दिन’ येत आहे. त्यामुळे बहुतेक सर्व जणांनी आपल्या पोल्ट्री उद्योगाला जोमाने सुरुवात केलेली आहे.
Maval news : चिकन, अंड्याची मागणी वाढली ; पोल्ट्री उद्योजकांना ’अच्छे दिन’










Leave a Reply