Bhosari news : फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीजतर्फे ’माझे कामगार माझी जबाबदारी’ मोहिम

Bhosari news : फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीजतर्फे ’माझे कामगार माझी जबाबदारी’ मोहिम

Pckhabar- फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन मार्फत पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरात ’माझे कामगार माझी जबाबदारी’ ही मोहीम आज (शुक्रवार) सुरू करण्यात आल्याची माहिती असे फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी दिली.

फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला उद्योजक संजय भोर, कार्तिक गोवर्धन, वैभव जगताप, राहुल भगत, सोनू ओव्हरी, संजय कुलकर्णी, राजाराम शितोळे यांच्यासह अनेक उद्योजक उपस्थित होते.  उद्योजकांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि या कल्पनेचे स्वागत केले.
शासनाने ’माझे घर माझी जबाबदारी’ही राबविण्यात येत आहे. मात्र, ही मोहिम फक्त घरापर्यंतच सिमीत न राहता पिंपरी चिंचवड, चाकण शिवने, तळेगाव परिसरातील औद्योगिक कंपन्यांमध्ये राबविणे गरजेचे आहे. या परिसरात वीस ते पंचवीस हजार कंपन्या आहेत.  या कंपन्यांमध्ये दहा ते पंधरा लाख कामगार काम करत असतात. कोरोना विषाणूंचा  प्रादुर्भाव घरापर्यंत जाऊ शकतो. तो रोखण्यासाठी आणि शासनाला सहकार्य करण्यासाठी प्रत्येक उद्योजकाने आपल्या कंपनीमध्ये ’माझे कामगार माझी जबाबदारी’ ही संकल्पना राबविल्यास नक्कीच याचा खूप मोठा फायदा संपूर्ण समाजाला होऊ शकतो, असे मत फोरम स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी व्यक्त केले.  ज्या उद्योगांमधील कामगारांची तपासणी करावयाची असेल त्यासाठी डॉक्टर अजिंक्य तापकीर, माऊली हॉस्पिटलची सुसज्ज अ‍ॅम्ब्युलन्स आणि डॉक्टरांचे पथक मागणीनुसार कंपन्यांमध्ये जाऊन पूर्ण तपासणी सुद्धा करतील या कंपन्यांमधील कामगारांच्या तपासण्या करावयाचे आहेत, त्यांनी फोरमचे अध्यक्ष अभय भोर यांच्याशी संपर्क साधल्यास योग्य ती मदत केली जाईल, असे फोरमचे अध्यक्ष  भोर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *