Pimpri news: 26 नगरसेवकांची कोरोनावर मात; तीन आजी, सहा माजी नगरसेवकांचा मृत्यू

Pimpri news: 26 नगरसेवकांची कोरोनावर मात; तीन आजी, सहा माजी नगरसेवकांचा मृत्यू
Pckhabar-पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्वपक्षीय 29 नगरसेवकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. बाधित झालेल्या 26  नगरसेवकांनी त्यावर यशस्वी मात केली आहे. तर, महापालिकेतील विद्यमान तीन नगरसेवक आणि 6 माजी नगरसेवकांना कोरोनाने कायमचेच गाठले.

लॉकडाऊन काळात या गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी जीवाची पर्वा न करता लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणात धावून आले. अन्नधान्य वाटप, भाजीपाला वाटपाचे काम केले. औषध फवारणी,  रुग्णांना बेड मिळवून देणे, औषधे मिळवून देण्यासाठी मदत केली आहे. तसेच स्वत: पीपीई किट घालून थर्मल स्कॅनिंग करण्याचे कामसुद्धा केले. रुग्णालयास व्हेंटिलेटरपासून ऑक्सिजन सिलिंडरपर्यंत वैद्यकीय मदत केली. हे करत असताना पालिकेच्या तब्बल 29 नगरसेवकांना कोरोनाची लागण झाली. त्यातील 26 नगरसेवकांनी कोरोनावर यशस्वी मात केली. तर, दुर्दैवाने तीन नगरसेवकांना जीव गमवावा लागला.

‘या’ 26 नगरसेवकांनी हरविले कोरोनाला!

भाजपच्या चंदा लोखंडे, शारदा सोनवणे, कमल घोलप, सीमा सावळे, आशा शेंडगे, सुजाता पालांडे, निर्मला कुटे, साधना मळेकर, भीमाबाई फुगे, स्वीनल म्हेत्रे, नीता पाडाळे, उत्तम केंदळे, शैलेश मोरे, विलास मडिगेरी, बाबू नायर, तुषार कामटे, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, सागर अंगोळकर, शशिकांत कदम, शिवसेनेचे राहुल कलाटे, निलेश बारणे, राष्ट्रवादीचे नाना काटे, शीतल काटे, डब्बू आसवानी, अनुराधा गोफने यांना कोरोनाची बाधा झाली होती. या सर्व नगरसेवकांनी इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनावर मात केली. त्यातून बरे होत ते पुन्हा जनसेवेत सक्रीय झाले आहेत.

तीन विद्यमान आणि 6 माजी नगरसेवकांना कोरोनाने कायमचेच गाठले

लॉकडाऊन काळात गोरगरिब जनतेला सुमारे 15 लाख रूपयांचे अन्नधान्य वाटप करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे चिखलीतील नगरसेवक दत्ता साने यांना कोरोनाची बाधा झाली. कोरोनाने त्यांचा बळी घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीचेच आकुर्डीतील नगरसेवक जावेद शेख यांनाही कोरोनाशी सामना करताना जीव गमवावा लागला. भाजप नगरसेवक लक्ष्मण उंडे यांचाही कोरानामुळे मृत्यु ओढावला. तर, जनसेवा करताना लोकांच्या संपर्कात आल्याने माजी नगरसेवक रंगनाथ फुगे, साहेबराव खरात, एकनाथ थोरात, लक्ष्मण गायकवाड, सुलोचना बडे, हनुमंत खोमणे यांचे देहावसान झाले.जनतेत मिसळून काम करणा-या आजी – माजी नगरसेवकांचा कोरोनाने बळी घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *