Pimpri News: आता मास्कविना फिरणा-यांवर माजी सैनिक करणार कारवाई; 50 माजी सैनिकांची नियुक्ती
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात मास्कविना फिरणारे, सार्वजनिक ठिकाणी फिरणा-यांवर 50 माजी सैनिकांची टीम कारवाई करणार आहे. त्यांना दरमहा दहा हजार रुपये मानधन आणि दंड वसुलीवर 30 टक्के प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव, प्रसार वाढत आहे. पालिका हद्दीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, मास्कविना फिरणा-या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी माजी सैनिकांची नेमणूक केली जाणार आहे. कोविड उपद्रव निरीक्षक म्हणून सहा महिन्याकरिता तात्पुरत्या स्वरुपात दहा हजार मानधन आणि 30 टक्के प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.
पथकासाठी 50 माजी सैनिकांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. या कामकाजासाठी प्रति माजी सैनिक दरमहा दहा हजार मानधन खर्चानुसार तीन महिन्याकरिता 15 लाख रुपये खर्च येणार आहे. मानधन आणि प्रोत्साहन भत्याची प्रत्यक्ष होणारी रक्कम भांडार विभागातील कोविड निधीतून खर्च केली जाणार आहे. त्याला स्थायी समितीने मान्यता दिली आहे.










Leave a Reply