Pimpri Corona News: आज 661 कोरोनाचे नवीन रुग्ण, 664 जणांना डिस्चार्ज तर 13 मृत्यू

Pimpri Corona News: आज 661 कोरोनाचे नवीन रुग्ण, 664 जणांना डिस्चार्ज तर 13 मृत्यू

Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 570 आणि पालिका हद्दीबाहेरील 91 अशा 661 कोरोनाच्या नवीन रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 664 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात आजपर्यंत 81 हजार 942 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 76 हजार 50 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1396 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 537 अशा 1933 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 2826 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1245 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.

शहरातील 8 जणांचा आणि पालिका हद्दीबाहेरील 5 अशा 13 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात चिंचवड येथील 82, 70 वर्षीय दोन वृध्द, चिखलीतील 75 वर्षीय वृध्द, भोसरीतील 52 वर्षीय पुरुष, थेरगावातील 39 वर्षीय पुरुष, दिघीतील 48 वर्षीय पुरुष, चिंचवड येथील 74 आणि 35 वर्षीय दोन महिलांचा मृत्यू झाला आहे, तर, पिंपरी-चिंचवड हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी-चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात उरळी देवाची येथील 72 वर्षीय पुरुष, जुन्नर येथील 73 वर्षीय, मुंबईतील 54 वर्षीय, चाकण मधील 48 वर्षीय पुरुषाचा, खेड येथील 58 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *