Wakad news : वाकडचा रस्ते विकास होणारच, सत्ताधारी भाजपला राज्य सरकारचा दणका

वाकडचा रस्ते विकास होणारच, सत्ताधारी भाजपला राज्य सरकारचा दणका

Pckhabar-वाकड प्रभाग क्रमांक 25 वाकडमधील ताथवडेतील जीवननगकडून बेंगलोर-मुंबईकडे जाणारा 24 मीटर रुंद डीपी रस्ता आणि प्रभागात आवश्यकतेनुसार रस्ते काँक्रीटीकरण करण्याचे स्थायी समितीने फेटाळलेले प्रस्ताव मार्गी लावावेत असा आदेश राज्य सरकारने पालिकेला दिला आहे. त्यामुळे वाकड मधील रस्ते विकास होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ताथवडेतील जीवननगरकडून मुंबई-बेंगलोरकडे जाणारा विकास आराखड्यातील 24 मीटर रुंद रस्ता विकसीत करण्याचा 20 कोटी 33 लाख रुपयांचा आणि प्रभागात आवश्यकतेनुसार रस्ते काँक्रीटीकरण करणे ( 30 कोटी 69) असे 51 कोटी दोन लाख रुपयांचे आयुक्तांचे प्रस्ताव सत्ताधारी भाजपने कोणतेही सबळ कारण न देता मतदान घेऊन हे दोनही प्रस्ताव फेटाळले होते.

त्याविरोधात शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी राज्याच्या नगरविकास खात्याकडे दाद मागितली. त्यावर नगरविकास खात्याने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा अभिप्राय मागविला होता. आयुक्तांनी रस्ते विकास गरजेचा असल्याचा अभिप्राय दिला आहे. त्यानंतर नगरविकास खात्याने पालिकेचे फेटाळलेले प्रस्ताव निलंबित केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *