Pimpri News: हाच पारदर्शक कारभार का? राहुल कलाटे

Pimpri News: हाच पारदर्शक कारभार का? राहुल कलाटे

Pckhabar-एक महिन्यापूर्वी कोविड सेंटरची माहिती मागविली होती. अद्याप मिळालेली नाही. महापालिकेला माहिती देण्याचे वावगे आहे का, हाच पारदर्शक कारभार का, असा सवाल शिवसेना गटनेते राहूल कलाटे यांनी केला आहे. तसेच कोणते सेंटर बंद करणार, कोणत्या निकषांवर बंद करणार हेही महापालिकेने स्पष्ट केले नाही, असेही ते म्हणाले.

शहरात सुरू असलेल्या कोविड सेटंरच्या खर्चाबाबत कलाटे यांनी एक महिन्यापूर्वी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून माहिती मागविली. मात्र, महापालिका प्रशासनाने त्यांच्या पत्रावर कोणतेही उत्तर दिले नाही. तसेच येत्या काही दिवसांत महापालिका आपले पाच कोविड सेंटर बंद करणार आहे. त्यातील म्हाळूंगे येथिल कोविड सेंटर महापालिकेने बंद केले आहे.

मात्र, हे कोविड सेंटर बंद करताना कोणते निकष लावले आहेत. आर्थिक निकषांवर कोविड सेंटर बंद केले जाणार आहे की रुग्ण संख्येच्या आधारावर बंद केले जाणार आहेत, हे अद्याप महापालिकेने स्पष्ट केले नाही. महापालिके या सर्व गोष्टींची तातडीने माहिती द्यावी, अशी मागणी राहूल कलाटे यांनी पत्राद्वारे महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *