Aakurdi news : आकुर्डीच्या स्टार हॉस्पिटलमध्ये धक्कादायक प्रकार समोर
कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतरही आयसीयूच्या बिलात वाढ
Pckhabar- कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर देखील मयत रुग्णाच्या नातेवाईकांकडून आयसीयूचे वाढीव भाडे घेतल्याबाबत आकुर्डीच्या स्टार हॉस्पिटलचे संचालक आणि कॅशियर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संचालक डॉ. अमित वाघ आणि कॅशियर (नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुस्तफा अब्दुल गफार तांबोळी (वय 19, रा. भांगरे कॉलनी, पाटीलनगर, चिखली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तांबोळी यांच्या आई मुमताज अब्दुल गफार तांबोळी (वय 37) यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने आकुर्डी येथील स्टार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान त्यांचा त्रास वाढल्याने त्यांना आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आले. उपचार सुरु असताना तांबोळी यांच्या आईचा 24 ऑगस्ट रोजी रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. 24 ऑगस्ट रोजी रात्री सव्वादहा वाजता तांबोळी यांच्या आईला डॉक्टरांनी मयत घोषित केले. तरीही हॉस्पिटल प्रशासनाने हॉस्पिटलच्या बिलात 25 ऑगस्ट पर्यंतचे बिल बनवले. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बिल बनवून पैसे स्वीकारणार्या व्यक्तीने फिर्यादी यांच्याकडून व्हेंटीलेटरचे 9 हजार रुपये वाढीव बिल स्वीकारले. याबाबत हॉस्पिटलचे संचालक डॉ. अमित वाघ आणि तांबोळी यांचे बिल बनवून पैसे स्वीकारणार्या इसमाच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायतक पोलीस निरीक्षक पी. डी. आरदवाड तपास करत आहेत.
दरम्यान, नगरसेवक शेख यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्या पत्नीने पोलिसांना स्टार हॉस्पिटल प्रशासनाच्या विरोधात तक्रार अर्ज दिला होता.
Aakurdi news : आकुर्डीच्या स्टार हॉस्पिटलमध्ये धक्कादायक प्रकार समोर










Leave a Reply