Pimpri news: लायन्सच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
Pckhabar- कोविडच्या काळात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्यामुळे रक्तपेढ्यांच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून लायन्स क्लब ऑफ पूना निगडी चॅरिटेबल ट्रस्ट,लायन्स क्लब्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी-2 चे रिजन पवना, इंद्रायणी, सिंधू व आधार रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या लायन्स क्लबच्या सभागृहात करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 25 जणांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन माजी प्रांतपाल ओमप्रकाश पेठे व श्रद्धा पेठे यांच्या हस्ते झाले. समारोप प्रांतपाल अभय शास्त्री व माधुरी शास्त्री यांनी केला. लायन्स क्लब चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी हरिदास नायर, अशोक येवले, चंद्रशेखर पवार व विश्वस्त यांच्या योग्य नियोजनातून हा महायज्ञ पार पडला. लायन सुदाम मोरे, मुरलीधर साठे, दिलीपसिंह मोहिते, समीक्षा मंधान या प्रांतातील पदाधिकार्यांचे मार्गदर्शन मिळाले. शहरातील लायन्स क्लब अध्यक्ष मारुती मुसमाडे, मकरंद शाळीग्राम, अमृतराव काळोखे, शीला कृष्णदास, अरुण इंगळे, संदेश लाड, सुहास गनबोटे, भीमसेन अगरवाल, नेहूल कुदळे यांची मोलाची साथ मिळाली. लायन्सचे तरुण सभासद ऋषिकेश मुसमाडे, कार्तिक पवार, सुशांत मोरे, स्वप्नील पारखे, अंकिता पारखे, दिग्विजय मोहिते व त्यांच्या मित्रांनी रक्तदान करून आपल्या सेवाकार्याची सुरुवात केली.
ला दुर्गा शंकर बेहरा, तेजश्री अडीगे, रामकृष्ण मंत्री, जयंत मांडे, अजितकुमार देशपांडे, सुनेत्राराजे मोहिते, किरण सुरवाडे यांनी रक्तदान शिबिरास उपस्थित राहून इतरांचे मनोधैर्य वाढविले.
Pimpri news: लायन्सच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद










Leave a Reply