Pimpri Water News: मंगळवार, बुधवारी पाणीपुरवठा विस्कळीत राहणार
Pckhabar-रावेत येथील जलउपसा केंद्रातील उच्चदाब वीज संच मांडणीचे अचानक तातडीचे उद्भवल्याने उद्या मंगळवारी सकाळी 11 ते 12.30 या कालावधी जलउपसा बंद राहणार आहे. त्यामुळे 12 नंतरचा, सायंकाळचा, रात्रीचा तसेच दूस-या दिवशी बुधवारी सकाळचा संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा कमी दाबाने व विस्कळीत राहणार आहे.
जलउपसा केंद्र रावेत येथील पंपगृहांमधील 22 के.व्ही. उच्चदाब वीज संच मांडणीचे अचानक उद्भवलेले उपस्कर वाहिनीचे तातडीचे दुरूस्ती काम करण्यात येणार आहे. त्यासाठी उद्या मंगळवारी सकाळी 11 ते 12.30 या कालावधी मध्ये जल उपसा बंद राहणार आहे. त्यामुळे मंगळवारी दुपारी 12 नंतरचा, सायंकाळचा व रात्रीचा तसेच दूस-या दिवशी बुधवारी सकाळचा संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा कमी दाबाने व विस्कळीत होणार आहे.
नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा व जल निःसारण विभागाचे सह शहर अभियंता रामदास तांबे यांनी केले आहे.










Leave a Reply