Talegaon news : संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा अग्नी प्रदीपन समारंभ उत्साहात
Pckhabar- श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा 23 व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ आज (सोमवार) कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेेगडे व त्यांच्या सुविधा पत्नी छायाताई भेगडे यांच्या या हस्ते करण्यात आला.
यावेळी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले, संचालक अनिल लोखंडे, तुकाराम विनोदे, चेतन भुजबळ, दिलीप दगडे, शिवाजी पवार, बाळासाहेब बावकर, मधुकर भोंडवेे, सुभाष राक्षे, महादेव दुडेे, शामराव राक्षे, प्रविण काळजे, नरेंद्र ठाकर, बाळासाहेब गायकवाड, संचालक शुभांगी गायकवाड, ताराबाई सोनावणे, ज्ञानेश नवले, महेश भसे, जयनाथ काटे, दत्तात्रय माळी, मुख्य कार्यकारी अधिकारी एन.पी.दुर्वे यांच्यासह सभासद शेतकरी, कारखाना अधिकारी व कामगार उपस्थित होते.
कारखान्याच्या कार्यक्षेत्राध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने गळीत हंगामासाठी 7400 हेक्टर ऊसाची नोंद झालेली आहे. यातून गाळपासाठी 5 लाख 50 हजार मे. टन ऊस उपलब्ध होईल. गळीत हंगामाकरिता कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व शेतकर्यांनी कारखान्याकडे ऊस पाठवून सहकार्य करावे. कारखान्याने गळीत हंगाम चालू करण्याच्या दृष्टीने गाळप क्षमतेइतकी ऊस तोडणी वाहतुक यंत्रणाये करार केलेले आहेत.
शासनाच्या धोरणाप्रमाणे कारखान्याचा गळीत हंगाम ऑक्टोबरमध्ये तिसर्या आठवड्यात सुरु करणार असल्याची माहिती कारखाखान्याचे कार्यकारी संचालक एस जी पठारे यांनी दिली.










Leave a Reply