Pimpri News: पालिकेच्या प्रभाग अध्यक्षपदी ‘यांची’ होणार निवड
Pckhabar– पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठही प्रभाग समिती अध्यक्षांची निवडणूक बिनविरोध होणार आहे. विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसने अर्ज भरले नाहीत. त्यामुळे बिनविरोध निवडीवर 9 ऑक्टोबर रोजी शिक्कामोर्तब होणार आहे.
भाजपकडून ‘अ’ प्रभाग अध्यक्षपदासाठी शर्मिला बाबर, ‘ब’ प्रभाग सुरेश भोईर, ‘क’ प्रभाग राजेंद्र लांडगे, ‘ड’ प्रभाग सागर आंगोळकर, ‘ई’ प्रभाग विकास डोळस, ‘ग’ प्रभाग अध्यक्षपदासाठी बाबा त्रिभुवन, ‘ह’ प्रभाग हर्षल ढोरे आणि ‘फ’ अध्यक्षपदासाठी कुंदन गायकवाड यांचा अर्ज भरला आहे. अर्ज भरण्यासाठी आज दुपारी तीन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत वेळ होती. या मुदतीत केवळ भाजपचे अर्ज आले. विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसने अर्ज भरले नाहीत. त्यामुळे बिनविरोध निवडणूक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
9 ऑक्टोबर रोजी प्रत्यक्षात निवडणूक होणार आहे. व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे ही सभा होणार आहे. या सभेत बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब होईल.










Leave a Reply