Pckhabar- देहूगाव, प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तथा नेत्ररोग तज्ञ डॉ. किशोर यादव यांच्या वाढदिवसानिमित्त दिलदोस्ती मित्र परिवारातर्फे रूग्णांची गैरसोय टाळण्यासाठी 200 लिटर क्षमतेचे सोलर पॅनल आरोग्य केंद्रात बसविण्यात आले.
वाढदिवसानिमित्त डॉ. यादव यांचा शाल, श्रीफळ, पुणेरी पगडी घालून सन्मान करण्यात आला. याप्रसंगी दिलदोस्ती परिवाराचे सर्व सदस्य, देहू ट्रेकर्स आदी मान्यवर उपस्थित होते.
कोरोनाच्या जागतिक महामारीत अहोरात्र मेहनत घेऊन देहूगावातील कोरोना नियंत्रणासाठी डॉ. यादव व त्यांची टिम लढा देत आहे. डॉ. यादव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली देहूगावातील दिलदोस्ती मित्र परिवाराने त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणार्या रूग्णांची गैरसोय टाळण्यासाठी 200 लिटर क्षमतेचे 35 हजारांचे गरम पाण्याचे सोलर पॅनेल बसविण्यात आले.

तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जाई निलेश मोरे यांच्या वतीने आरोग्य केंद्राच्या परिसरात 35 वृक्षांचे रोपन करण्यात आले.










Leave a Reply