Dehu news : कोविड योध्दा डॉ. किशोर यादव यांना देहूकरांनी वाढदिनी दिल्या अनोख्या शुभेच्छा ! (व्हिडिओ)

Dehu news : कोविड योध्दा डॉ. किशोर यादव यांना देहूकरांनी वाढदिनी दिल्या अनोख्या शुभेच्छा ! (व्हिडिओ) 

Pckhabar- तीर्थक्षेत्र देहूगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी, कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. किशोर यादव यांना समस्त देहूकरांच्या वतीने काही तरूण मंडळींनी वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर सपत्नीक पुष्पवृष्टी करून अनोख्या पध्दतीने शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांची रांगोळीमध्ये आकर्षक अशी प्रतिमा साकारली होती.

कोरोनाच्या जागतिक महामारीत अहोरात्र मेहनत करून देहूगावातील कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी डॉ. यादव यांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक आरोग्य केंद्रासह कोविड सेंटरमधील संपूर्ण टिम लढा देत आहे. देहूगावातील कोरोना रूग्ण संख्या नियंत्रणात आणण्यास त्यांच्या टिमला यश आले आहे. डॉ. यादव यांचा 3 ऑक्टोबर रोजी वाढदिवस होता. वाढदिवसाचे औचित्य साधून समस्त देहूकरांच्या वतीने तरूण मित्रांनी आरोग्य केंद्राच्या परिसरात त्यांच्यासह त्यांची पत्नी डॉ. विद्या यादव यांच्यावर पुष्पवृष्टी केली. तसेच केक कापून उत्कृष्ट अशी एक प्रतिमा भेट देऊन मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला. डॉ. किशोर यादव यांची रांगोळीमध्ये आकर्षक अशी प्रतिमाही साकारली.

याबाबत डॉ. किशोर यादव म्हणाले, देहूगाव कोरोनामुक्त करण्याचे ध्येय ठेवून आमचे प्राथमिक आरोग्य केंद्रातील, कोविड सेंटरमधील सर्व कर्मचारी, ग्रामपंचायत प्रशासन, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पत्रकार आदी मेहनत घेत आहेत. वाढदिवसानिमित्त तरूण मित्रांनी अनोख्या पध्दतीने शुभेच्छा दिल्याने आपण भारावून गेलो आहोत. देहूकरांचे प्रेम पुढेही असेच कायम राहील, अशी अपेक्षा व्यक्त करतो. सर्व मित्रांचे मनापासून आभार मानतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *