Dehu news : 21 गरजू महिलांना साडी वाटप
Pckhabar- कर्तव्य फाउंडेशनच्या सदस्यांच्या वतीने 21 गरजू महिलांना आज (रविवार) साडी वाटप करण्यात आले.
सामाजिक बांधिलकी जोपासत तीर्थक्षेत्र देहूगाव येथील कर्तव्य फाउंडेशनचे सर्व सदस्य वाढदिवसासह विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने अनेक गोर-गरीब नागरिकांना मदतीसाठी सदैव तत्पर असतात.
कर्तव्य फाउंडेशनचे सदस्य सचिन पोरे यांच्या आईच्या स्मृती प्रित्यर्थ, विशाल काळे यांच्या पत्नीच्या आणि विनोद वनवारी यांच्या जन्मदिनाच्या निमित्त 21 महिलांना साडी वाटप करण्यात आल्याची माहिती फाऊंडेशनच्या सदस्यांनी दिली.










Leave a Reply