Pimpri Corona news : कोरोनाचे शहरात 544 नवे रूग्ण, 20 जणांचा मृत्यू, 691 जणांना डिस्चार्ज
Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी कोरोनाचे 544 नवे रूग्ण आढळले. तर 20 जणांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी 691 जणांना घरी सोडण्यात आले आहे.
शहरात 80 हजार 480 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 3 हजार 434 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात रविवारअखेर 68 हजार 453 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत 1 हजार 879 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मनपा हद्दीतील 1 हजार 361 तर 518 मनपा हद्दीबाहेरील आहेत.
रविवारी 3 हजार 170 संशयित रूग्णांना महापालिकेच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. 2 हजार 511 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले. 1 हजार 887 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. शहरातील 6 हजार 101 घरांना भेटी देऊन 20 हजार 839 जणांचे सर्व्हेक्षण करण्यात आले.
Pimpri Corona news : कोरोनाचे शहरात 544 नवे रूग्ण, 20 जणांचा मृत्यू, 691 जणांना डिस्चार्ज










Leave a Reply