Lonavala news : सकल धनगर समाजाकडून राज्यभर चक्काजाम आंदोलनाची हाक

Lonavala news : सकल धनगर समाजाकडून राज्यभर चक्काजाम आंदोलनाची हाक

Pckhabar- : धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या १६ ऑक्टोबर रोजी संपूर्ण राज्यभर चक्का जाम आंदोलनाची हाक सकल धनगर समाजाकडून देण्यात आली आहे. धनगर आरक्षण लढा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य यांची दिशा निश्चिती बैठक लोणावळा शहरात रविवारी पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

धनगर समाजाच्या या दिशा निश्चिती बैठकीला माजी मंत्री अण्णा डांगे, माजी आमदार प्रकाश शेंडगे, रमेश शेंडगे, रामराव वडकुटे, पोपटराव गावडे, गणेश हाके आदींसह अनेक नेते आणि सुमारे २०० कार्यकर्ते हजर होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना प्रकाश शेंडगे यांनी जीसके हाथ मे काठी, उसकी भैस हा कायदा जर राज्यात असेल तर धनगर समाज आणि ओबीसी समाजाला देखील हातात दंडुका घ्यावा लागेल अशी पाळी आणू नका असा इशारा सकल धनगर समाजाच्या वतीनं सरकारला दिला. 

 

मराठा आरक्षणाला स्थगिती असतानाही अध्यादेश काढून आरक्षण लागू करू शकतो अशी महाविकास आघाडीच्या नेत्यांची भूमिका आहे, मात्र मागील सात वर्षांपासून आरक्षणाचा विषय प्रलंबित असताना धनगर समाजाच्या बाबत असा अध्यादेश निघत नाही. मराठा समाजाला एक न्याय आणि धनगर समाजाला दुसरा न्याय असं का? हा प्रश्न उपस्थित करीत प्रकाश शेंडगे यांनी समाजाच्या वतीनं उपस्थित केला. तसेच येत्या १६ तारखेच्या आंदोलनानंतरही सरकारने दखल घेत आरक्षण दिले नाही तर आंदोलनाचे स्वरूप आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *