Dehu news : अभंग प्रतिष्ठानतर्फे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मोबाईल
Pckhabar- गरजू आणि गोर गरीब मुलांचे ऑनलाइन शिक्षण थांबू नये, यासाठी देहूगावातील अभंग प्रतिष्ठानच्या वतीने कोविड सेंटरमध्ये कार्यरत असणारे सेवा कर्मचारी निलेश पवार यांच्या मुलांसाठी एक तर संस्कृती दत्तात्रय पवार हिलाही मोबाईल फोन देण्यात आला आहे.
अभंग प्रतिष्ठान,श्रीक्षेत्र देहू यांच्या वतीने कोरोनाच्या संकटकाळात ऑनलाईन शिक्षणासाठी अँड्रॉइड मोबाईल फोन असणे आवश्यक झाले आहे. ऑनलाईन माध्यमातून विद्यालयामध्ये शिक्षण प्रक्रिया चालू होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ होऊनही काही विद्यार्थ्यांकडे असे मोबाईल फोन नसल्याकारणाने ऑनलाइन शिक्षणापासून हे विद्यार्थी वंचित राहत आहे, हे लक्षात आल्यानंतर अशा गरजू विद्यार्थ्यांना मोबाईल देण्याचे नियोजन करण्यात आले. यावेळी देहूतील कोविड सेंटर सुरू झाल्यापासून या सेंटरमध्ये अत्यंत सेवाभावनेने कार्यरत असणारे सेवा कर्मचारी निलेश पवार यांना कोविड सेंटरमध्ये कामात जास्त वेळ जात होता. घरी एकच फोन असल्यामुळे तो त्यांच्या जवळच असल्याकारणाने घरी मुलांसाठी फोन देऊ शकत नव्हते. निलेश यांनी अभंग प्रतिष्ठानशी संपर्क साधल्यानंतर त्यांना दैनंदिन वापरासाठी एक मोबाईल उपलब्ध करून दिला. डॉ. किशोर यादव यांच्या हस्ते निलेश पवार यांना मोबाईल भेट देण्यात आला.
कु.संस्कृती दत्तात्रय पवार ही बारावी विज्ञान शाखेत अध्यापन करत आहे. ऑनलाइन शिक्षणासाठी अद्यापही या तिच्याकडे असा फोन नव्हता, हे लक्षात आल्यानंतर या ताईला अभंग प्रतिष्ठानच्या वतीने पुस्तके व मोबाईल फोन उपलब्ध करून देण्यात आला. या मोबाईल फोन साठी विशेष सहकार्य विजय मोरे, आयबीएन लोकमतच्या वृत्तनिवेदिका कु.स्वाती गोडसे, विकास कंद,
सचिन कुंभार, सागर मोरे, सचिन बा.काळोखे व दिनेश कुंभार यांचे लाभले. अभंग प्रतिष्ठानच्या सदस्यांनी या विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.
भविष्यातील शैक्षणिक वाटचालीत काही अडचणी आल्या त्या निश्चितपणे आम्ही सोडवू असा विश्वास त्यांना दिला. आपल्या अवतीभवती अद्यापही ऑनलाइन शिक्षणापासून वंचित असणारे कोणी विद्यार्थी असतील तर निश्चितपणे संपर्क साधा. अभंग प्रतिष्ठान आपल्या शैक्षणिक वाटचालीस सहकार्य करण्यास सदैव तत्पर आहे.











Leave a Reply