‘लोकप्रतिनिधींची निवेदने, तक्रारींवर तत्काळ कारवाई करा; अन्यथा कारवाई’
पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा विभागप्रमुखांना इशारा
Pckhabar- मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी, नगरसेवक यांच्या पिंपरी-चिंचवड पालिकेकडे निवेदने, तक्रारी येत असतात.
लोकप्रतिनिधींच्या तक्रारींवर तत्काळ यथोचित कारवाई करावी. केलेल्या कारवाईचा अहवाल त्यांना अवगत करावा. विलंब केल्यास विभागप्रमुखांवर नियमाधीन कारवाई करण्यात येईल असा इशारा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे.
याबाबतचे अत्यंत महत्वाचे परिपत्रक विभागप्रमुखांना पाठविले आहे. शहरातील विकास कामे, विविध बाबींबाबत मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी, नगरसेवक यांच्या पिंपरी-चिंचवड पालिकेकडे निवेदने, तक्रारी येत असतात. त्यावर कारवाई करणे अभिप्रेत आहे. त्यावर केलेल्या कारवाईची माहिती पालिकेच्या वेबसाईटवरील कर्मचाऱ्यांसाठी एनन्तइन्ट्रानेट, इ-फाईल नोंद, आवक टपाल रजिस्टरमध्ये अद्यावत करण्यात यावी. परंतु, निवेदने, तक्रारींवर कारवाई होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. ही बाब गंभीर असून कार्यालयीन सुसूत्रेस धरून नाही. यामुळे जनमानसातील पालिकेच्या विश्वासहरतेस तडा जात आहे. लोकप्रतिनीधींच्या तक्रारींवर तत्काळ यथोचित कारवाई करावी. कारवाईबाबत लोकप्रतिनीधींना
लागलीच अवगत करून तक्रारी निकालात काढण्यात याव्यात. त्याप्रमाणे नोंदी ताबडतोब संगणकीय रजिस्टरमध्ये घेण्यात याव्यात.
लोकप्रतिनीधींच्या पत्रावर प्राधान्याने कारवाई न केल्यास
अथवा त्यांना अवगत करण्यात न आल्याची बाब निदर्शनास आल्यास. त्याचप्रमाणे संगणकीय आवक रजिस्टरमध्ये शेरा कॉलमध्ये केलेल्या कारवाईचा तपशील नमूद करावा. तसे न केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विभागप्रमुख, शाखाप्रमुखांची राहील. त्यांच्या विरुद्ध नाइलाजास्तव नियमाधीन कारवाई केली जाईल, असे परिपत्रकात स्पष्ट केले आहे.










Leave a Reply