Pimpri corona News: आज 816 जणांना डिस्चार्ज, 598 नवीन रुग्णांची नोंद, 22 मृत्यू
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 816 जणांना आज (शनिवारी) डिस्चार्ज देण्यात आला आहे. विविध भागातील 598 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 79 हजार 933 झाली आहे.
शहरात आजपर्यंत 79 हजार 936 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 67 हजार 806 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1348 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्या 511 अशा 1859 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 3466 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.
शहरातील 11 जणांचा आणि पालिका हद्दीबाहेरील 11 अशा 22 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात चिंचवड,
च-होली, प्राधिकरण, थेरगाव, चिखली, मोशी, चिंचवड, भोसरी, आंबेगाव, कात्रज, अलिबाग, कामशेत, भिगवण, चाकण, तळेगाव दाभाडे, हडपसर येथील रुग्णांचा मृत्यु झाला आहे.










Leave a Reply