Pimpri news: कन्या विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांना अभिवादन

Pimpri news: कन्या विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांना अभिवादन
Pckhabar-रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय पिंपरी वाघेरे या शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी व थोर स्वातंत्र्यसेनानी, देशाचे माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती ऑनलाईन माध्यमातून संपन्न झाली.

विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर ऑनलाईनच्या माध्यमातून सत्य , अहिंसा या मार्गांचा अवलंब करून देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे महात्मा गांधी व इमानदारी व सच्चेपणा या गुणांसाठी प्रिय असणारे लाल बहाद्दूर शास्त्री. या थोर नेत्यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील कार्य याविषयी- विद्यालयातील विद्यार्थिनी कु भोईटे रिया , कु यादव भूमिका, कु सावनी सुर्वे यांनी मनोगत व्यक्त केले. व कु सृष्टी वाळुंजकर या विद्यार्थिनीने महात्मा गांधींवर सुंदर कविता ऑनलाइनच्या माध्यमातून सादर केली.

या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा शेटे व पर्यवेक्षिका उर्मिला पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व अध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनघा रांगणेकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *