देहूतील रखडलेल्या रस्त्याच्या कामाबाबत खासदार कोल्हे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट

देहूतील रखडलेल्या रस्त्याच्या कामाबाबत खासदार कोल्हे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट

Pckhabar- देहू तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पुलाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, येलवाडीच्या बाजूने भूसंपादनाच्या नुकसान भरपाईची रक्कम मान्य नसल्याने रस्त्याच्या ३० मीटर रुंदीकरणाचे काम रखडले आहे. या रखडलेल्या कामा संदर्भात शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची भेट घेऊन निवेदन दिले.

देहू तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पुलाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, येलवाडीच्या बाजूने भूसंपादनाची प्रकिया पुर्ण झाली नाही. शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मान्य नसल्याने रस्त्याच्या ३० मीटर रुंदीकरणाचे काम अनेक दिवसांपासून रखडले आहे. त्यामुळे संपूर्ण रस्ता होऊनही या रस्त्याचा वापर होत नाही. रखडलेल्या कामाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता.

खासदार कोल्हे यांनी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची भेट घेऊन त्यांना खेड उपविभागीय अधिकाऱ्यांनी पाठवलेल्या भूसंपादनाचा प्रस्तावावर तत्काळ निर्णय घेण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी देशमुख यांनी या संदर्भात लक्ष घालून लवकर निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे खासदार कोल्हे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *